न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते
न ही ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते, हे NSBT चे तत्त्वज्ञान आमचे चेअरमन श्री. नंदकिशोर कागलीवाल यांच्या तत्त्वज्ञानाचे प्रतिबिंब आहे. या जगात आत्मज्ञानासारखे शुद्ध होण्याचे दुसरे कोणतेही माध्यम नाही, असे भगवद् गीते मध्ये 4 थ्या अध्यायातील 38 व्या श्लोकात भगवान श्रीकृष्ण म्हणतात.
एक शैक्षणिक संस्था म्हणून शुद्ध ज्ञान देण्यासाठी आम्ही या ओळीचा स्वीकार केला आहे. कर्म करण्यासाठी चारित्र्य आणि आवश्यक क्षमतेची गरज आहे.
कृतियुक्त आणि मूलभूत तत्त्वांवर आधारलेल्या जीवनात आमच्या विद्यार्थ्यांना चढ-उतारांना धैर्याने आणि दृढनिशचयाने सामोरे जाण्यास चारित्र्य साहाय्य करते.
भगवद् गीता या 5000 वर्षांपूर्वीच्या धर्मग्रंथात ध्येयपूर्ण जीवन जगण्याबद्दल सखोल विचार केला आहे. भगवद् गीता मानव जातीला सर्वक्षेत्रांमध्ये उत्कृष्ट बनण्याची प्रेरणा देते. मग ती संपत्तीप्राप्त करणे असो किंवा भौतिक इच्छांची पूर्तता असो, शेवटी स्वतःला जागृत करते. विज्ञान आणि तंत्रज्ञान हे स्पष्ट करते की, एखाद्या व्यक्तीने सकारात्मक वृत्तीने कृतियुक्त जीवन जगले पाहिजे, कारण आत्म साक्षात्काराचा हा एकच मार्ग आहे.